
पोलीस दलात खळबळ उडून देणारी एक घटना कल्याण इथे समोर आलेली असून रेल्वे प्रोटेक्शन फोर्स येथील एका संतप्त कॉन्स्टेबलने वरिष्ठ असलेल्या पोलीस उपनिरीक्षक यांची थेट हत्या केलेली आहे. बसवराज गर्ग असे मयत पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून पंकज यादव असे आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे. कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकलेल्या आहेत .
कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज यादव आणि बसवराज गर्ग हे दोघेही 2010 साली एकत्र काम करत होते त्यावेळी पंकज याची चौकशी गर्ग यांनी केलेली होती त्यानंतर त्याची चार वर्षांची वेतन वाढ रोखण्यात आलेली होती. चार वर्षांपासून यादव हा त्यांच्यावर खार खाऊन होता त्याची सध्याची पोस्टिंग पेन येथील आरपीएफ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रोहा येथे असून दुपारी साडेतीनच्या सुमारास तो पेन वरून कल्याण इथे गर्ग यांचा खून करण्याच्या उद्देशाने आलेला होता
रात्री पावणेदहाच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक बसवराज गर्ग हे कल्याण येथील एका ठिकाणी हेडफोनवर गाणे लावून ऐकत असताना आरोपी पंकज यादव हा तिथे आला आणि लाकडी दांडक्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्या हल्ल्यात गर्ग यांचा मृत्यू झालेला असून त्यानंतर आरोपीने त्यानंतर तेथून पळ काढला आणि पुन्हा रोहा येथे पोहोचला. कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकलेल्या असून तपास सुरु आहे.