
महाराष्ट्रात येत असलेला वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर राज्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या सरकारची निष्क्रियता यामागे कारणीभूत आहे असे आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून यासंदर्भात राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या जाहीर सूचनेमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आल्या असून मुंबईतील फोनपे कार्यालय देखील आता कर्नाटक येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. बंगळुरू येथे हे कार्यालय हलविण्यात येणार असून राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाला हा मोठा धक्का आहे. महाराष्ट्रातील बहुतांश प्रकल्प इतरत्र जात असून राज्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.
#PhonePe Debited from Maharastra, credited to Karnataka.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 22, 2022
वेदांतानंतर #PhonePe ची बारी
गब्बर होतायेत शेजारी
महाराष्ट्र पडतोय आजारी
व्वा रे 🤔 सत्ताधारी!!!
टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक #PAY
महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा #WAY! pic.twitter.com/RTrgLzCOTj
डिजिटल पेमेंटमध्ये अग्रस्थानी असलेले फोन पे आता बंगळुरू येथे जाणार असून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी याप्रकरणी ट्विट करून , ‘ वेदांतानंतर #PhonePe ची बारी. गब्बर होतायेत शेजारी.. महाराष्ट्र पडतोय आजारी .. व्वा रे 🤔 सत्ताधारी!!!.. टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक #PAY.. महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा #WAY! ‘ असे म्हटले आहे