व्हाट्सएप्प स्टेटसवरचा अकरावा फोटो पाहिला जाईपर्यंत तर..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड इथे समोर आलेली असून तालुक्यातील पारगाव येथे एका तरुणाने व्हाट्सअपवर स्टेटसला स्वतःला श्रद्धांजली वाहिल्याचा फोटो टाकत रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केलेली आहे. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडलेली असून त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

उपलब्ध माहितीनुसार, आदित्य ओव्हाळ असे मयत तरुणाचे नाव असून तो शेतकरी कुटुंबातील होता. पारगाव येथे त्याचा मेडिकलचा व्यवसाय देखील होता आणि वडिलांना आई-वडिलांना एकुलता एक असल्याने त्याला लाडात कुटुंबाने वाढवलेले होते . काही महिन्यांपूर्वी त्याचे लग्न देखील झालेले होते मात्र अचानकपणे त्याने हा टोकाचा निर्णय का घेतला हे समोर आलेले नाही.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या व्हाट्सअप स्टेटसला स्वतःचे अकरा फोटो टाकलेले होते त्यामध्ये शेवटच्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली असे त्याने लिहिलेले होते आणि हा प्रकार लक्षात येण्याच्या आत त्याने धावत्या रेल्वेखाली उडी मारली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून घटनेमागचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.


शेअर करा