शंभर वर्षांपूर्वी हिटलरने जे केले अगदी त्याच पद्धतीने..

शेअर करा

पंतप्रधान मोदी हे हिटलरला समोर ठेवून काम करत आहेत त्यामुळे देशातील परिस्थिती अराजक निर्माण करणारी झालेली आहे . मागील तीन महिन्यांपासून मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू आहे मात्र मोदी याविषयी काही बोलायला तयार नाहीत म्हणून केंद्र सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता त्याला पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत उपस्थित राहणे गरजेचे आहे मात्र ते लोकसभेत येतच नाहीत ही सगळी हुकूमशाहीची लक्षणे आहेत असा हल्लाबोल युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी पुण्यात केलेला आहे.

डॉक्टर कुमार सप्तर्षी म्हणाले की ,’ शंभर वर्षांपूर्वी हिटलरने जे केले अगदी त्याच पद्धतीने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत त्यामुळे ते संसदेत फिरकत नाहीत . मणिपूरमध्ये एवढा मोठा हिंसाचार सुरू आहे त्यावर केंद्र सरकार काय करताय मणिपूर सरकार काय करते हे देशाला समजले पाहिजे. मोदी यांनी संसदेत येऊन बोलले पाहिजे नाहीतर हे फॅसीझमचे सरकार जाणार आहे.

स्वारगेट येथील या संकल्पसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण , ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी रघु ठाकूर , काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे हेदेखील यावेळी उपस्थित होते.


शेअर करा