शरद पवारांबद्दलचे ‘ ते ‘ वृत्त म्हणजे अंबानी समूहाचा खोडसाळपणा

शेअर करा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नामकरण करताना संभाजीनगर असे केले आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव असे केले मात्र त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे केलेले होते. बहुतांश राजकीय पक्षांनी या निर्णयाचे समर्थन केले या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दौरा केला असताना ‘ मी संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार ‘ अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे वृत्त एका प्रसारमाध्यमाने दिलेले होते.

सदर चॅनलने हा खोडसाळपणा केल्याचे समोर आलेले असून अंबानी समूहाशी निगडित असलेल्या या चॅनलने जाणीवपूर्वक शरद पवार यांनी जे म्हटलेच नाही त्याची अक्षरशः खोटी बातमी प्रसारित केलेली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या बाबतीत प्रसारित झालेल्या या बातमीबद्दल सदर वृत्त देणाऱ्या चॅनेलच्या विरोधात कायदेशीर कारवाई आम्ही लढणार आहोत असे म्हटलेले आहे.

सुरज चव्हाण यांनी ट्विट करून या संदर्भात अधिक माहिती देताना ,’ छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांपासून मी आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहे . साहेबांनी कुठल्याच कार्यक्रमात या शहराच्या नामांतराविषयी आपले मत मांडलेले नाही. एका वृत्तवाहिनीने याबाबतीत खोडसाळपणा केलेला आहे . या वाहिनीच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत ,’ असे देखील सुरज चव्हाण यांनी ठणकावले आहे. गेल्या काही वर्षांपासून सूत्रांच्या माध्यमातून अशा आशयाचे कॅप्शन देऊन चारित्र्यहनन करत सर्रास खोट्या बातम्या अनेक चॅनेलकडून सुरु आहेत.


शेअर करा