
चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली ‘ शाईफेक ‘ महाराष्ट्रात चांगलीच चर्चेत आलेली असून सातत्याने महापुरुषाबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना या शाईफेकीचा चांगलाच धसका बसलेला आहे. परभणी येथील एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी पोलिसांनी चक्क पत्रकारांच्या पेनमधील शाई कुठली आहे हे देखील चेक केले सोबतच बॉलपेन असणाऱ्या पत्रकारांना तात्काळ प्रवेश दिला गेला .
चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या संघटनात्मक दौऱ्यासाठी परभणी येथे आले होते त्यावेळी मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपस्थित असलेल्या पोलिसांनी पत्रकारांजवळ पेन कुठला आहे याचेदेखील चाचपणी केली आणि बॉलपेन असणाऱ्या पत्रकारांना तात्काळ प्रवेश देण्यात आला मात्र शाईपेन असणाऱ्या पत्रकारांना शाई कुठल्या रंगाची आहे हे पाहून त्यानंतर आत सोडण्यात आले. आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न देखील यावेळी करण्यात आला.