शाळा आहे का मुन्नाभाई एमबीबीएसचा सेटअप ? , मोदी नेटिझन्सच्या निशाण्यावर

शेअर करा

‘ रेवडी कल्चर ‘ वरून विरोधकांना खडे बोल सुनावणारे पंतप्रधान प्रत्यक्षात मात्र गुजरातमध्ये रोज नवनवीन प्रकल्पाच्या घोषणा करत आहेत तसेच भूमिपूजनाचा देखील त्यांनी धडाका लावलेला आहे अर्थात त्यातील किती पूर्ण कामे झाली हा मात्र संशोधनाचा विषय आहे . गुजरात निवडणुकीची तारीख अद्यापपर्यंत जाहीर झालेली नसल्याने पंतप्रधान मोदी यांनी वेगवेगळ्या आश्वासनांचा देखील सपाटा लावलेला आहे. मोदी यांनी गुजरातमध्ये मिशन स्कूल ऑफ एक्सैलेन्स याचे उद्घाटन केले त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून संवाद साधला आणि एका विद्यार्थ्याने सादर केलेले प्रेझेंटेशन मागच्या बेंचवर बसून पाहिलेले होते. त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या फोटोवर जोरदार टीका सुरू झालेली आहे.

पंतप्रधान मोदी यांचा हा वर्ग खोटा असल्याची टीका होत असून मोदी ज्या खोलीत बसलेले आहेत ‘ तो केवळ एक फिल्मी सेट आहे. हा सेट पाहून मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाची आठवण झाली ‘ अशी देखील नेटिझन्स टीका करत आहेत. वर्गातली खिडकी देखील थ्रीडी खिडकी असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झालेली असून ही खिडकी नसून केवळ एक चित्र चिटकवलेले आहे असे सांगण्यात येत आहे. वर्गांमध्ये केवळ एक स्टुडिओ असल्यासारखे राखाडी कार्पेट ठेवलेले आहे हे देखील फोटोमध्ये दिसून येत आहे.

पंतप्रधान मोदी यांचे हे फोटो पाहिल्यानंतर मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील डुप्लिकेट हॉस्पिटलची आठवण झाली अशी देखील टीका केली जात असून मोदी ज्या वर्गात बसलेले आहेत तिथे केवळ पाच विद्यार्थी आहेत. अल्पवयीन मुलांना आपल्या प्रचारासाठी वेठीस धरल्याची मोदींवर टीका केली जात असून केवळ फोटोशूटसाठी हा सर्व सेट उभा करण्यात आला आहे अशीही टीका केली जात आहे अन अर्थातच ही टीका सोशल मीडियावर होत असून गोदी मीडियात प्रश्न विचारण्याची हिम्मतच राहिलेली नाही .


शेअर करा