शासकीय कामासाठी क्रश सॅण्ड वापरण्याचा निर्णय : राधाकृष्ण विखे पाटील

शेअर करा

शासकीय कामाच्या नावाखाली आत्तापर्यंत राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा झालेला आहे त्याची पुनरावृत्ती पुढील काळात होऊ नये म्हणून सर्व शासकीय कामांसाठी आता क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण शासन घेणार आहे अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर अस्तगाव परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन ग्रामस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत .

विखे पाटील म्हणाले की , ‘ शासन आपल्या दारी या उपक्रमाची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली असून मागील काही दिवसात महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन लोकाभिमुख निर्णयाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे त्यामध्ये 600 रुपये दराने नागरिकांना वाळू उपलब्ध करून दिली. सध्या वाळूमाफिया नवीन धोरणाला बदनाम करत आहेत मात्र कोणाच्याही दबावाला बळी न पडता हे धोरण आम्ही यशस्वी करून दाखवणार आहोत.

या आधीच्या काळात शासकीय कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा झालेला आहे . शासकीय कामांना आता यापुढील काळात क्रश सॅण्ड वापरण्याचे शासनाने घेतलेले असून नव्या वाळू धोरणात घरकुलाच्या लाभधारकांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे , ‘ असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा