शाही दवाखान्यापासून तर करिअर अकॅडमीपर्यंत , नगरच्या बसस्थानकांवर पोस्टरबाजांचा धुमाकूळ

शेअर करा

नगर शहरातील बसस्थानकांना सध्या पोस्टरबाजांनी घेरलेले असून नगर शहरात तारकपूर बस स्टॅन्ड, माळीवाडा बस स्टॅन्ड आणि पुणे बस स्टॅन्ड ही मुख्य बस स्थानके आहेत. नगर शहरात अनेक ठिकाणावरून रोज लोक दैनंदिन कामकाजासाठी येत असतात मात्र शहरातील बसस्थानकांमध्ये देखील सध्या स्वच्छतेचा अभाव पाहायला मिळत असून तीनही बसस्थानकात अशीच परिस्थिती आहे.

बसस्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजांनी धुमाकूळ घातलेला असून त्यामध्ये कुणाचीही परवानगी न घेता रात्री अपरात्री येऊन पोस्टरबाज चित्रे चिटकवून जातात त्यामध्ये करिअर अकॅडमी , नोकरी विषयक जाहिराती ,अर्जंट भरती ,कर्ज मिळवणे अशा स्वरूपाच्या बहुतांश जाहिरातीसोबतच काही धार्मिक कार्यक्रमाच्या देखील जाहिराती हे पोस्टरबाज चिटकून जातात. उत्तम क्वालिटीचे पोस्टर असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांना देखील हे पोस्टर निघत नाहीत त्यामुळे शहरातील बसस्थानके यामुळे विद्रूप झालेली आहेत.

पोस्टरबाजांनी शहरातील बस स्थानके विद्रूप केलेली असताना दुसरीकडे प्रवासी नागरिकांवर देखील कुणाचा अंकुश नसल्याने बसस्थानकाच्या बाजूला लघुशंकेसाठी सुविधा उपलब्ध असताना देखील मोकळ्या जागेतच अनेक जण लघुशंका करत असल्याने बसस्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे .आगार प्रमुखांनी याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत असून शहरातील बसस्थानके यामुळे विद्रुप होत आहेत .


शेअर करा