शिवसेनेच्या दोन्ही गटांना काय मिळाले नाव अन चिन्ह ? , राज्यात सत्तासंघर्ष पेटणार

शेअर करा

शिवसेनेच्या दोन गटातील सत्तासंघर्ष निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेला असून निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना चिन्हे तसेच नाव दिलेले असून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला ‘ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘ असे नाव देण्यात आले आहे तर त्यांना ‘ पेटती मशाल ‘ असे चिन्ह देण्यात आलेले आहे.

3 नोव्हेंबर रोजी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक होणार असून त्यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या अंतर्गत दोन गट पडल्यानंतर नक्की शिवसेना कोणाची हा वाद सध्या कोर्टात सुरू असल्याने शिवसेनेचे मूळ चिन्ह असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलेले आहे. आपल्या गटाला काय नाव द्यायचे तसेच काही चिन्ह हवे आहे ? यासाठी निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना विचारणा करण्यात आली होती.

ठाकरे गटाने आपले प्रथम चिन्ह म्हणून त्रिशूल दिलेले होते तर दुसरे चिन्ह उगवता सूर्य आणि तिसरे चिन्ह मशाल हे होते. पहिल्या दोन्ही चिन्हांवर शिंदे गटाने दावा केलेला होता त्यामुळे ही दोन्ही चिन्हे शिवसेनेला मिळाली नाहीत तर तिसरे चिन्ह असलेली धगधगती मशाल हे चिन्ह शिवसेनेला देण्यात आलेले आहे. सदर चिन्ह यापूर्वी एका पक्षाला दिले होते मात्र सध्या तो पक्ष अस्तित्वात नसल्यामुळे हे चिन्ह मुक्त करण्यात आले आहे अर्थात हा निर्णय केवळ अंधेरी पूर्व निवडणुकीपुरता असून त्यानंतर निवडणूक आयोगासमोर निवाडा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

ठाकरे गटाने त्रिशूल आणि शिंदे गटाने त्रिशूल आणि गदा या चिन्हांवर दावा केलेला होता मात्र ही दोन्ही चिन्हे धार्मिक संदर्भ असल्याने देण्यात आलेली नाहीत तर उगवता सूर्य हे चिन्ह तामिळनाडू येथील पक्षाकडे सध्या असल्याने शिंदे गटाची ही तीनही चिन्हे नाकारण्यात आलेले आहेत. एकनाथ शिंदे गटाला ‘ बाळासाहेबांची शिवसेना ‘ असे नाव देण्यात आलेले असून ‘ ढाल आणि तलवार ‘ हे चिन्ह देण्यात आले आहे .


शेअर करा