शेंडी चौकातील अपघातानंतर ग्रामस्थांचा पोलिसांवर ‘ वसुली ‘ चा आरोप

शेअर करा

नगर शहरात सध्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असल्याने बहुतांश जड वाहतूक ही शहराबाहेरील बायपासवरून वळविण्यात आलेली आहे मात्र त्यामुळे बायपास रोडवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असून त्यातून एक अपघात नगर औरंगाबाद महामार्गावर शेंडी चौकात झालेला होता .सदर घटनेत एका चिमूरड्याचा मृत्यू झालेला असून वडील देखील गंभीर जखमी झालेले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, संतोष रामदास काळे ( वय 28 राहणार बहिरवाडी तालुका नगर ) हे आपली पत्नी आणि मुलगा कुणाल यांना घेऊन जेऊरकडे चालले होते. शेंडी बायपास चौकात एमआयडीसीकडे वळत असलेल्या एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली अन अपघातात कुणाल काळे या चिमुरड्याचा मृत्यू झाला . संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्यानंतर नगर औरंगाबाद रोडवर रस्ता रोको आंदोलन केले होते यावेळी तब्बल सहा किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागलेली होती.

संतप्त आंदोलकांनी यावेळी शेंडी चौकात उभ्या असलेल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसेच 24 तास तिथे उभे राहून फक्त अवजड वाहनचालकाकडून पैसे घेऊन या वाहनांना शहरात प्रवेश दिला जातो. पैसे दिले नाही तर चालकांना बायपासवरून पाठवण्यात येते असे देखील म्हटले आहे . एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर तब्बल अडीच तासानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली .


शेअर करा