श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुन्हा पुनरावृत्ती , दुसरा विवाह केला अन ..

शेअर करा

श्रद्धा वालकर

श्रद्धा वालकर प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत असून त्याहीपेक्षा भयावह असे हत्याकांड झारखंड राज्यातील रांची येथे उघडकीला आलेले आहे. रांची येथील साहिबगंज इथे एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा खून केला आणि धक्कादायक बाब म्हणजे तिच्या मृतदेहाचे तुकडे करून भटक्या कुत्र्यांच्या समोर टाकले.

उपलब्ध माहितीनुसार, रुबिका पहाडीना ( वय 22 ) असे मयत महिलेचे नाव असून पोलिसांनी तिचा पती दिलदार अन्सारी याच्यासोबतच त्याच्या आठ नातेवाईकांना देखील बेड्या ठोकल्या आहेत. रुबीका पहाडीना एका आदिवासी कुटुंबातील असून तिने दिलदार याच्यासोबत विवाह केलेला होता. दिलदार याची पहिली पत्नी देखील त्याच्यासोबत राहत असून त्यांनी हा दुसरा विवाह केला होता. त्यांच्यातील प्रेम प्रकरण समोर आल्यानंतर दोन्ही बाजूचे कुटुंबीय यासाठी तयार होत नव्हते मात्र दोन्ही व्यक्ती वयस्क असल्याकारणाने पोलीस ठाण्यातच त्यांचा विवाह पार पडलेला होता.

सदर प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत तिच्या मृतदेहाचे अठरा तुकडे जप्त केले असून हत्याकांड करण्यासाठी वापरण्यात आलेले शास्त्र देखील ताब्यात घेतले आहे. दिलदार याच्या कुटुंबीयांनी त्याला हा खून करण्यासाठी मदत केल्याचे देखील समोर आले असून पोलिसांनी दिलदार याचे वडील मुस्‍तकीम अन्सारी, आई मरियम खातून, त्याची पहिली पत्नी आणि त्याचा भाऊ आमिर यांना ताब्यात घेतले आहे.


शेअर करा