
बेटी बचाव बेटी पढाव यासारखे नारे देऊन भाजपने आम्ही महिलांच्या हक्कासाठी किती लढतो असे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी भाजप पक्षाला मात्र अनेकदा त्यांच्या नेत्यांच्या कृत्यामुळे शरमेने मान खाली घालावी लागते. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबत बेडरूममधील व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली होती त्यानंतर या व्हिडिओमधील महिलेने अर्थात मुंबईतील भाजप पदाधिकारी असलेल्या महिलेने एक व्हिडिओ जारी केलेला असून त्यामध्ये श्रीकांत देशमुख यांच्यासह त्यांचे मोठे भाऊ शशिकांत देशमुख यांच्यावर देखील खळबळजनक आरोप केलेले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, निर्मला यादव असे या महिलेचे नाव असून त्यांनी म्हटल्याप्रमाणे श्रीकांत देशमुख यांनी आपल्या सोबत सात फेरे घेऊन विवाह केलेला आहे. पंढरपूर येथे आम्ही जोडीने दर्शनाला देखील अनेकदा गेलेलो आहोत मात्र तरीदेखील मोठ्या भावाच्या दबावामुळे श्रीकांत देशमुख हे आपल्याला पत्नी म्हणून मानण्यास नकार देत असून आपल्यासोबतचे सर्व संपर्क तोडून आपल्यावरच दबाव आणण्याचे काम करत आहेत.
निर्मला यादव यांनी या व्हिडिओत शशिकांत देशमुख यांच्यावर देखील अत्यंत खळबळजनक आरोप केलेले असून श्रीकांत देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडलेले आहे. आपल्याला मूल व्हावे यासाठी कोकणात घेऊन जायचा देखील प्लॅन यांचा होता असे सांगत त्यांनी मी निर्मला यादव देवगिरीच्या राजघराणे असलेल्या यादव कुटुंबाशी संबंधित आहे त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका असे देखील आव्हान त्यांनी केलेले आहे गरज पडली तर देवेंद्र फडणवीसपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत जाण्याची माझी तयारी आहे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे .
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी देखील आपण संपर्कात होतो मात्र सुषमाताई अंधारे आणि रूपालीताई चाकणकर यांनी आपल्याला मदत केली त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी घाबरून जाऊन आपल्यावर दडपयंत्र चालू केलेले आहे मात्र त्याला आपण बळी पडणार नाही असे देखील त्यांनी ठणकावले आहे. तब्बल अर्धा तासांचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून श्रीकांत देशमुख यांच्या इतर कुटुंबीयानी मात्र आपल्याला कधी अंतर देणार नाही असे देखील म्हटले असून त्यांचा संताप हा शशिकांत देशमूख आणि श्रीकांत देशमुख यांच्यावरच असल्याचे दिसून येत आहे .