
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आणि मराठा आरक्षण चळवळीतील नेते म्हणून ओळख असलेले नगर येथील शिवप्रहार संघटनेचे संस्थापक इंजिनीयर संजीव भोर पाटील यांनी 22 तारखेला त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यानंतर त्यांची राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे.
नगर जिल्ह्यात संजीव भोर यांची मराठा आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले नेतृत्व म्हणून ओळख आहे. मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संजीव भोर यांनी त्यांच्या सहकार्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजीव भोर यांचा सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा अभ्यास नक्कीच उपयोगाचा ठरेल असे म्हटले आहे. संजीव भोर यांचे महाराष्ट्रभर असलेले समर्थक आणि त्यांचा दांडगा संपर्क याचा पक्षाला फायदा होईल असे देखील ते म्हणाले.