सकाळी ज्याच्याबद्दल पोस्ट दुपारी त्याच्याच गाडीखाली पत्रकाराचा मृत्यू

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून देशात पत्रकारांना काम करणे अवघड होत असून अनेक पत्रकारांवर हल्ले देखील झालेले आहेत. रत्नागिरी इथे एक प्रकार समोर आलेला असून नाणार प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प होणार असल्याची घोषणा केलेली होती त्यानंतर व्हाट्सअपमध्ये एक मेसेज शेअर करण्यात आला आणि ज्यांनी हा मेसेज शेअर केला त्या पत्रकाराचा अपघातात संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे. राजापूर इथे हा अपघात थार गाडी आणि दुचाकी यांच्यात झालेला असून पत्रकार शशिकांत वारीसे यांचा यात मृत्यू झालेला आहे. गाडी चालवणारे पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र शशिकांत यांच्या कुटुंबाकडून हा घातपात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली असून सदर पोस्ट देखील पंढरीनाथ आंबेरकर यांच्याचबद्दल होती.

शशिकांत वारीसे यांनी परिसरात कार्यरत असलेल्या एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये रिफायनरी ग्रुप प्रकल्पाबद्दल एक माहिती टाकत एक प्रश्न उपस्थित केलेला होता त्यामध्ये ‘ मोदीजी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे फोटो ‘ असे म्हणत एका बातमीचे कात्रण त्यांनी टाकलेले होते. रिफायनरीचे समर्थक असलेले पंढरीनाथ आंबेरकर यांच्यासंदर्भात त्यांनी ही बातमी शेअर केलेली होती.

दुपारी एकच्या सुमारास राजापूर कोदवली येथील पेट्रोल पंपासमोर शशिकांत वारीचे हे चाललेले असताना भरधाव वेगाने आलेल्या एका महिंद्रा थार गाडीने त्यांना धडक दिली त्या धडकेत ते गंभीर जखमी झाले आणि तात्काळ त्यांना कोल्हापुरी येथे उपचारासाठी देखील हलवण्यात आले मात्र त्यानंतर त्यांचे निधन झालेले आहे. पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनी प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्नशील असून रिफायनरी समर्थक समितीचे अध्यक्ष देखील आहेत.

शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असून कारचालक असलेले पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी सकाळी जो पत्रकार विरोधातील बातमीची पोस्ट टाकतो त्याच्याच गाडीला दुचाकीची धडक बसून त्याचा त्यामध्ये मृत्यू होतो हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे म्हटलेले आहे. रत्नागिरी येथील सर्व पत्रकार बांधवांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केलेली असून जिल्हा पोलीस प्रमुखांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे. सदर प्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी पत्रकार बांधवांकडून करण्यात आलेली आहे.


शेअर करा