सख्ख्या बहिणींसोबत बोहल्यावर , अनोखा विवाह अडचणीत

शेअर करा

सख्ख्या बहिणींसोबत बोहल्यावर

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आली असून मुंबई येथे राहणाऱ्या जुळ्या बहिणींना लहानपणापासून एकत्र राहण्याची सवय असल्याने अखेर दोघींनी आयुष्याचा साथीदार देखील एकच निवडलेला असून त्यांचा हा विवाह सोलापूर येथे पार पडला मात्र विवाह पार पडल्यावर अवघ्या काही तासात हा विवाह कायद्याच्या कचाट्यात अडकलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रिंकी आणि पिंकी अशी या बहिणींची नावे असून दोघेही आयटी कंपनीत मोठ्या पदावर काम करतात. वडिलांच्या पश्चात त्या आईसोबत राहत होत्या त्यानंतर सहा महिन्यापूर्वी आई आजारी पडली त्यावेळी येथील अतुल नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना मदत केली होती त्यावेळी त्यांचे त्याच्यावर प्रेम जडले आणि दोघींनीही आयुष्याचा साथीदार म्हणून त्याची निवड केली. त्यांचा हा विवाह सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे पार पडला मात्र अवघ्या काही तासात कायद्याच्या कचाट्यात अडकलेला आहे.


शेअर करा