सचिन तेंडुलकरजी..तुमच्यातील माणूस आणि माणुसकी कुठेही दिसून येत नाही

शेअर करा

सचिन तेंडुलकरजी..तुमच्यातील माणूस आणि माणुसकी कुठेही दिसून येत नाही

नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्या इव्हेंटमध्ये अपशकुन नको म्हणून अक्षरशः फरफटत महिला कुस्तीपटू यांचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी मोडीत काढलेले होते. भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव असून महिला खेळाडूंनी लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर देखील पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नव्हता जो अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नोंदवण्यात आलेला आहे त्यामध्ये चक्क पॉस्को कलम देखील लावण्यात आलेले आहे तरी देखील पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक केलेली नाही.

महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी , अभिनेत्री कंगना राणावत , खासदार नवनीत राणा यांनी याप्रकरणी चुप्पी साधलेली असून एका महिला पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर भाजपच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यावर चक्क पळून जाण्याची वेळ आलेली होती. क्रिकेट क्षेत्रातील १९८३ ची वर्ल्ड कप विजेती टीम या तरुणींच्या समर्थनासाठी पुढे आलेले असून आता त्यामध्ये अनिल कुंबळे यांचा देखील समावेश झाला आहे तर दुसरीकडे सचिन तेंडुलकर मात्र अद्यापपर्यंत शांत आहे.

क्रिकेटचा देव म्हणून मिरवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने आतापर्यंत त्याची भूमिका स्पष्ट केलेली नाही. शेतकरी आंदोलनावर देखील गप्प राहणारा सचिन महिला खेळाडूंसंदर्भात असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात देखील शांत दिसून येत असल्याने सचिन कुस्तीपटूंवर कधी बोलणार ? अशा आशयाचे पोस्टर सचिनच्या मुंबईतल्या घरासमोर लावण्यात आलेले आहेत.

देशातील कुस्तीपटूंना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा जागतिक स्तरावर निषेध व्यक्त करण्यात आलेला असून जागतिक कुस्ती संघाने भारताचे सदस्यत्व रद्द करण्याचा देखील इशारा दिलेला आहे. ज्या महिला नेत्यांनी याप्रकरणी बोलणे गरजेचे आहे त्यांनी देखील चुप्पी साधलेली चाललेली आहे तर भारतरत्न सचिन तेंडुलकर हा देखील आंदोलनाबद्दल शांत असल्याकारणाने त्याच्या घरासमोर फ्लेक्स बाजी करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा या खेळाडूंच्या बाजूने मैदानात उतरलेले आहेत.

काँग्रेस राष्ट्रवादीकडून देखील सचिन तेंडुलकरच्या या भूमिकेचा समाचार घेण्यात आलेला असून , ‘ सचिन तेंडुलकरजी..भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये तुम्ही मूग मिळून गप्प का आहात कारण किसान आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला तुम्ही सणसणीत उत्तर दिलेले होते मात्र देशांतर्गत प्रश्नात तुम्ही शांत का आहात ? असा खडा सवाल विचारलेला आहे सोबतच तुम्हाला सीबीआय , इन्कम टॅक्स आणि इडी यांची भीती वाटते का ? किंवा तुम्ही कुठल्या इतर दबावाखाली आहात का ?. जेव्हा क्रीडा विश्वातील काही महिला लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत आहेत त्यावेळेस आम्हाला तुमच्यातील माणूस आणि तुमच्यातील माणुसकी कुठेही दिसून येत नाही , असेही काँग्रेसकडून विचारण्यात आलेले आहे .


शेअर करा