‘ सत्यमेव जयते ‘ म्हणत अखेर निलेश लंके यांचे उपोषण मागे

शेअर करा

निलेश लंके

राष्ट्रवादीचे नेते आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सात तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषण सुरू केल्यानंतर चौथ्या दिवशी अजित पवार यांनी या उपोषणाची दखल घेत निलेश लंके यांच्यासोबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत लंके यांचे बोलणे करून दिल्यानंतर अखेर निलेश लंके यांचे उपोषण मागे घेण्यात आले आहे. निलेश लंके यांनी यासंदर्भात एक पोस्ट लिहिलेली असून त्यामध्ये उपोषण मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे

काय आहे निलेश लंके यांची पोस्ट ?

सत्यमेव जयते ! अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गांच्या दुरावस्थेमुळे अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. अखेर या प्रश्नासाठी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसलो होतो. आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते श्री.अजितदादा पवार यांनी उपोषण स्थळी भेट घेत व जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, नॅशनल हायवे अथोरिटी चे चीफ इंजिनिअर शेलार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांच्या समवेत चर्चा करत माहिती घेतली व थेट ना.अजित दादा पवार यांनी बांधकाम खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली असता नितीनजी गडकरी साहेब यांनी रस्ता पूर्ण करण्याचा शब्द दिला व उपोषण मागे घेतले.यावेळी आ.संग्राम जगताप, राष्ट्रवादी चे नेते श्री.घनश्याम आण्णा शेलार, मा.जिल्हाध्यक्ष श्री.दादाभाऊ कळमकर,श्री.क्षितिज घुले,श्री.शिवशंकर राजळे व इतर सर्वपक्षीय कार्यकर्ते माझे सहकारी व जिवा-भावाची माणसे उपस्थित होती.


शेअर करा