
गेल्या काही दिवसांपासून सनातन धर्मावर सातत्याने वादग्रस्त विधाने करण्याचे सत्र सुरू असून उदयनिधीनंतर आता डी एम के खासदार ए राजा यांनी चक्क सनातन धर्माची तुलना ही एचआयव्हीसोबत केलेली आहे. ए राजा यांनी सनातन धर्मावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चक्क चर्चेचे आव्हान देखील दिलेले आहे.
ए राजा म्हणाले की , ‘ उदयनिधी संपूर्ण वादावर जे काही बोलले ते खूप कमी आहे. त्यांनी फक्त सनातन धर्माला मलेरिया आणि डेंगू असे म्हटलेले आहे मात्र सनातन धर्म हा सामाजिक आजार आहे आणि तो कुष्ठरोग आणि एचआयव्हीपेक्षा जास्त प्राणघातक आहे ‘, असे म्हटलेले आहे.
डीएमके सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केलेले होते. देशात त्यांच्या विरोधात सध्या संतापाचे वातावरण असून या पार्श्वभूमीवर ए राजा यांनी केलेल्या विधानानंतर संताप व्यक्त केला जात आहे. उदयनिधी यांनी डेंगू मलेरिया सोबत सनातन धर्माची तुलना केलेली होती त्यानंतर पुन्हा ए राजा यांनी वादग्रस्त विधान केलेले आहे.