सनी लिओनी म्हटली तरच मी सिगारेट सोडेन , सनीचा भन्नाट रिप्लाय

शेअर करा

सनी लिओनी

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांच्या कमेंटची दखल घेतात आणि त्यांना प्रतिक्रिया देखील देतात. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हीदेखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना ती दिलखुलास उत्तरे देते असाच काहीसा प्रकार समोर आलेला आहे.

पाकिस्तान येथील रहिवासी असलेला ए एम खान नावाच्या तरुणाला सिगारेट ओढण्याची सवय होती मात्र आपली ही सवय मोडण्यासाठी त्याने सोशल मीडियावर चक्क जर मला सनी लियोनीने रिप्लाय केला तर मी सिगारेट सोडेल असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. त्याच्या या पोस्टवर अनेक जणांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या मात्र सनी लियोनी हिने देखील त्याची ही पोस्ट वाचली आणि त्यानंतर त्याला ‘ मग तू केव्हा सिगारेट पिणे सोडतो आहेस ? ‘ असा प्रश्न विचारला. तिचा हा रिप्लाय सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला असून अनेक जणांनी तिने प्रतिक्रिया दिल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे.

त्याच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर त्याने ही पोस्ट एडिट केली आहे मात्र सनी लियोनी हिची प्रतिक्रिया येईल अशी त्याला अपेक्षा देखील नव्हती मात्र खुद्द सनी लियोनी त्याच्या पोस्टची दखल घेतल्याबद्दल सदर युवकाची देखील पाकिस्तानमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे तर सनी लियोनी हिचे देखील कौतुक करण्यात येत आहे.


शेअर करा