सयाजी शिंदे सापडले वेगळ्याच वादात

शेअर करा

मराठी चित्रपटसृष्टीतुन एक वेगळीच बातमी समोर आली असून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो असे सांगत पाच लाख रुपये मानधन म्हणून घेतले मात्र चित्रपटात कामही केले नाही आणि पैसे देखील परत केले नाही आणि आपली फसवणूक केली असा आरोप निर्माते आणि दिग्दर्शक शिवाजी बाबुराव ससाने ( राहणार वाई ) यांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे. सदर प्रकरणी पोलिस ठाण्यात देखील आपण अर्ज देणार आहोत असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.

दुसरीकडे सयाजी शिंदे यांनी केलेले आरोप शिंदे यांनी आपल्यावर केलेले आरोप फेटाळून लावले असून सचिन ससाने यांनीच आपली वीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे असे सांगत ही रक्कम आपल्याला देऊ देण्याची परत करण्याची वेळ येऊ नये म्हणून माझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी, अर्ज सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे असे सांगितले आहे सोबतच रात्रंदिवस आपल्याला फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.


शेअर करा