सरकारी कार्यालयात हेल्मेट घालून काम करतात कर्मचारी कारण..

शेअर करा

देशातील सरकारी कार्यालयांची परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी काही राज्यात मात्र अद्यापही जुन्या इमारतीत काम करणाऱ्या कामगारांना अक्षरशः जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे . असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून तेलंगणाच्या जगती या जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला आहे.

सदर कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर स्वतःच्या डोक्यात हेल्मेट घालून त्यानंतर काम करतात त्यामागील मुख्य कारण म्हणजे इमारतीची झालेली दुरावस्था हे आहे . मंडल परिषद विकास कार्यालयातील हे कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर डोक्यावर हेल्मेट चढवतात आणि त्यानंतर खुर्चीत बसतात.

काही महिन्यांपूर्वी इमारतीचा काही भाग कोसळून एक कर्मचारी थोडक्यात बचावलेला होता त्यानंतर कार्यालयाचे स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी अनेकदा कर्मचाऱ्यांनी केलेली आहे मात्र प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. सुमारे शंभर वर्ष जुनी इमारत असल्याने कुठल्याही क्षणी ती पडू शकते अशी परिस्थिती असल्याने तसेच सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्याने कर्मचारी अक्षरश: जीव मुठीत धरून काम करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षपणाचे एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे सरकारवर मात्र टीका करण्यात येत आहे.


शेअर करा