
देशात एक खळबळजनक असा प्रकार 24 जानेवारी रोजी समोर आलेला असून एका व्यक्तीने आपली सरकारी नोकरी वाचवण्यासाठी चक्क साडेतीन महिन्याच्या मुलीला कालव्यात फेकून दिले त्यात तिचा मृत्यू झालेला आहे. राजस्थान येथे बिकानेर परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून पोलिसांनी मुलीची आई आणि वडिलांना अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , झंवरलाल आणि गीता असे या दांपत्याचे नाव असून पती हा दियातर येथील एका शाळेत नोकरी करतो. नोकरीच्या वेळी त्याने आपल्याला दोन मुली असल्याचे प्रमाणपत्र दिलेले होते मात्र त्याला याआधीच आठ वर्षाच्या दोन मुली आणि पाच वर्षाचा एक मुलगा आहे. मोठ्या मुलीला त्याच्या भावाने दत्तक घेतलेले असून चौथी मुलगी झाल्यानंतर त्याने नोकरी वाचवण्यासाठी आपल्या बायकोसोबत हा कट रचला होता.
चौथे अपत्य पोटात राहिल्यावर त्याने कुणालाही काही सांगितले नाही आणि त्याच्या बायकोला तिच्या माहेरी पाठवून दिले. पत्नीला घेण्यासाठी दुचाकीवर तो गेलेला होता त्यावेळी बाळासोबत आईला घेऊन येत असताना त्याने या मुलीला कालव्यात फेकून दिले त्यात तिचा मृत्यू झालेला आहे . पोलिसांनी त्याला आणि पत्नीला ताब्यात घेतले असून त्याने तिला घरी घेऊन गेलो असतो तर माझी सरकारी नोकरी गेली असती म्हणून हा प्रकार केला असे सांगितले आहे.