सहकारी युट्युबरशी विवाहित पुरुषाचे प्रेमप्रकरण , पत्नीला प्रेयसी जाऊन भेटली अन..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील हा प्रकार आहे. आंबेडकर नगर येथील युट्युबर असलेला कल्याण नावाचा तरुण सोशल मीडियावर मोठा लोकप्रिय आहे. व्हिडिओ बनवण्याच्या निमित्ताने त्याला विमला नावाची एक तरुणी भेटली आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले त्यानंतर त्यांनी दोघांनी लग्न देखील केले.

लग्नाला काही वर्षे झाल्यानंतर त्यांच्या नात्यातला गोडवा कमी होऊ लागला आणि याच दरम्यान कल्याण याला विशाखापट्टनम येथील नित्यश्री नावाची एक तरुणी भेटली. ती देखील सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायची याच दरम्यान त्यांची मैत्री झाली. नित्यश्री हिचे काही वर्षांपूर्वीच ब्रेक-अप झाले होते तर दुसरीकडे कल्याण हा विवाहित होता मात्र तरीही त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

नित्यश्री हिने कल्याणच्या पत्नीला प्रत्यक्ष भेटून मला कल्याणसोबत लग्न करायचे आहे अशी मागणी केली आणि आमच्या लग्नाला तु होकार दे अशी देखील विनवणी केली अर्थात आपण तिघेही एकाच ठिकाणी राहू अशी देखील ती विमला यांना म्हणाली. विमला यांनी तिच्या या मागणीचा गांभीर्याने विचार केला आणि त्यानंतर तिच्या लग्नाला होकार दिला. पारंपारिक रितीरिवाजासह एका मंदिरात त्यांचे लग्न पार पडले असून त्यांच्या या अनोख्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे . त्यांच्या अनोख्या लग्नाची लोक जुदाई चित्रपटाशी तुलना करत आहेत.


शेअर करा