सातारा कराड बसमध्ये बसलेल्या ‘ त्या ‘ पोलिसाच्या विरोधात गुन्हा दाखल

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना साताऱ्यात समोर आलेली असून सातारा कराड असा प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन युवतीची चक्क कोल्हापूर पोलिस दलातील एका व्यक्तीने छेड काढण्याचा प्रकार समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर व्यक्ती हा कोल्हापूर पोलीसात काम करत असून पोलिसाने तिच्या शेजारी बसलेल्या युवतीसोबत अश्लील चाळे केले. सदर मुलीने तिच्या पालकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर कराड बसस्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

उपलब्ध माहितीनुसार, महेश मगदूम असे या संशयित आरोपीचे नाव असून सातारा ते कराड असा प्रवास सुरू असताना तो ह्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेला होता. आपल्या शेजारी पोलिस बसलेला असल्याने ही तरुणी शेजारी बसलेल्या व्यक्तीकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा ठेवत होती मात्र तिचा हा विश्वास फोल ठरलेला आहे. सदर तरुणीने त्यानंतर आपल्या पालकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि मोठ्या प्रमाणात कराड बसस्थानकात जमाव जमला. आरोपीच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कराड बसस्थानकात एसटी आली यावेळी एसटीच्याभोवती या तरुणीच्या मित्र-मैत्रिणी तसेच नातलगांनी गराडा घातला आणि या पोलिसाला जाब विचारला त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कोल्हापूर जिल्ह्यात हा पोलीस सध्या कार्यरत असून पोलीस दलातील तो खेळाडू आहे. सातारा शहरात सुरू असलेल्या पोलिस स्पर्धेसाठी तो आला होता त्यावेळी त्याने बसमध्ये आपल्यासोबत आक्षेपार्ह प्रकार केले असे या तरुणीचे म्हणणे आहे .


शेअर करा