साबुदाणाविषयी अफवा ऐकल्यात ना ? मग पहा हा व्हिडीओ

शेअर करा

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उपवासासाठी म्हणून वापरला जाणारा साबुदाणा बनवला जात असताना आरोग्य विषयक नियमांचे पालन केले जात नाही अशा अफवांमुळे सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे. उपवासासाठी चालणारा साबुदाणा बनवत असताना साबुदाण्याबद्दल अनेक अफवा देखील पसरलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओत साबुदाणा बनवत असल्याची पद्धत सोशल मीडियावर शेअर केली असून त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ज्या घरात साबुदाणा वापरला गेलेला नाही असे घर महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही. साबुदाणा बनवताना एका विशिष्ट झाडापासून तो बनवला जातो आणि तो बनवत असताना आरोग्य सुव्यवस्थेचे कुठलेही पालन केले जात नाही म्हणून उपवास करणाऱ्या व्यक्तींची देखील काही वेळेला चेष्टा केली जाते मात्र साबुदाणा बनवणार्‍या एका कंपनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये साबुदाणासाठी वापरण्यात येणारे झाड तोडणे पासून तर साबुदाणा बॅगमध्ये पॅक करेपर्यंतची सर्व पद्धती अत्यंत व्यवस्थितरित्या चित्रीत केलेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी साबुदाणाबद्दल होणारे गैरसमज दूर होतील अशी आशा बाळगूया.


शेअर करा