सासूनेच चक्क जावयासोबत केले लग्न, हनिमूनला जाऊन आल्यावर म्हणतेय की ?

शेअर करा

अनेक विचित्र बातम्यांचा खजिना म्हणजे बिहार राज्याचा उल्लेख केला जातो. अशीच एक घटना बिहार येथील मधेपुरा जिल्ह्यात समोर आलेली असून एका सासूने चक्क तिच्या मुलीचा संसार उध्वस्त करत जावयासोबत संसार थाटलेला आहे. सून आणि सासू यांची लग्न केवळ हनीमूनपर्यंत टिकली आणि त्यानंतर आता दोघीही समोरील व्यक्तीकडून घटस्फोटाची मागणी करत आहेत

उपलब्ध माहितीनुसार, बिहार येथील मारही नावाच्या गावात ही घटना समोर आली असून गावात राहत असलेला सुरज महातो ( वय २२ ) हा लग्न झाल्यानंतर त्याच्या सासूच्या प्रेमात पडलेला होता. सासूने देखील मागचा पुढचा विचार न करता त्याच्या प्रेमाला होकार दिला आणि त्यानंतर तिच्या मुलीचा संसार उध्वस्त झाला . सासूच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सुरज याने सासूशी लग्नगाठ बांधली आणि एक महिन्यांपूर्वी लग्न देखील केले.

सासुसोबत लग्न केल्यानंतर सुरज हा सासूला घेऊन हनीमूनला गेला आणि त्यानंतर एक महिन्यांनी सासु आशादेवी ( वय ४२) यास आपल्यामुळे मुलीचा संसार उध्वस्त झालेला आहे याची जाणीव झाली त्यानंतर दोघेही पुन्हा आपल्या घरी परतले. आशादेवी हिने तिच्या पतीकडे माफी मागितली आणि पुन्हा आपण पुर्ववत राहूया आणि मुलीचा संसार माझ्यामुळे उध्वस्त झाला यासाठी खेददेखील व्यक्त केला.

मुलीचे लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी सुरज हा आजारी पडलेला होता. आजारपणाच्या काळाला मुलीपेक्षा जास्त सासूने सुरज याची काळजी घेतली त्यामुळे दोघेही एकमेकांच्या जास्त जवळ आले. सुरज बरा झाल्यानंतर सासू तिच्या घरी परतली मात्र त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेम वाढत गेले आणि त्यातून त्यांनी लग्न देखील केले. लग्न झाल्यानंतर एक महिन्यांनी हनिमूनला जाऊन आल्यावर आपल्यामुळे आपल्या मुलीचा संसार उध्वस्त झाला आहे याची आशादेवी हिला जाणीव झाली आणि त्यानंतर तिने पश्चाताप व्यक्त केला. सुरज अशा वागण्याने सुरजची पहिली बायको ही वडिलांच्या घरी राहायला गेली असून आता ती परत येण्याचे नाव घेत नाही.


शेअर करा