
देशात सध्या एका सिरीयल किसरची जोरदार चर्चा सुरू असून धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी पाठीमागून येतो आणि महिलांचे चुंबन घेऊन त्यानंतर तिथून पळ काढतो. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झालेला असून हा प्रकार बिहारमधील जमुई परिसरात घडलेला आहे. त्याच्या दहशतीमुळे महिलांनी घराबाहेर एकटे पडणे बंद केलेले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला हॉस्पिटलच्या बाहेर फोनवर बोलत असताना अचानक तिथे हा तरुण येतो आणि आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तिच्यावर झडप घालतो आणि तिला पकडून जबरदस्तीने तिचे चुंबन घेतो आणि त्यानंतर तिला धक्का देऊन पळून जातो. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले असून हा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला असल्याकारणाने या माथेफिरूला तात्काळ अटक करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केलेली आहे.
बिहार का सीरियल किसर जो पीछे से आकर महिलाओं को किस कर भाग जाता है। वीडियो मुरई के सदर अस्पताल का है जहां एक आरोपी ने ये हरकत की है।@BiharPolice#Biharpolice #Bihar #serialkisser #jamui pic.twitter.com/d0af1LnHIq
— whatsthenews (@whatsthenewzz) March 13, 2023
सदर प्रकरणी बिहारमधील जमुई हॉस्पिटल परिसरात असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अद्यापपर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नाही. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला तिचे चुंबन घेतल्यानंतर आरडाओरडा करते मात्र तोपर्यंत तो पळून जातो असे दिसून येत असून सोशल मीडियावर आरोपीच्या विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे.