सीमा सचिनच्या प्रेमावर चित्रपटाचे ऑडिशन सुरु , काय आहे चित्रपटाचे नाव ?

शेअर करा

पाकिस्तानची सीमा हैदर भारतात सचिन मीना नावाच्या एका तरुणाच्या प्रेमात पडल्यानंतर चार मुलांसह दाखल झालेली होती. भारतात आल्यानंतर ती नोएडा परिसरात सचिनसोबत राहत असताना हे प्रकरण समोर आले आणि सोशल मीडियात त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली. सीमा हैदर हिची हिने धर्मांतर करत हिंदू धर्म स्वीकारला आणि सचिनसोबत संसार थाटला.

सोशल मीडियावर या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून इलेक्ट्रॉनिक मीडियाने केवळ सचिन आणि सीमा यांच्या प्रेमप्रकरणावर कित्येक तास खर्च केले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यांच्या बातम्या सोशल मीडियात इतक्या आल्या की ते रातोरात सेलिब्रिटी बनून गेले.फायरफॉक्स एंटरटेनमेंट या कंपनीने देखील त्यानंतर सचिन आणि सीमा यांच्या प्रेमप्रकरणावर चक्क चित्रपट बनवण्याचा देखील निर्णय घेतला. सीमा हिचा पती सौदी अरेबिया येथे नोकरी करत होता याच दरम्यान पब्जी गेम खेळताना तिचे सचिन सोबत प्रेमसंबंध जुळले आणि ती चार मुलांसह भारतात दाखल झाली.

त्यांच्या प्रेमप्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून कराची टू नोएडा या नावाने हा चित्रपट काही दिवसात प्रदर्शित होणार आहे त्यासाठी ऑडिशन देखील घेण्यास सुरुवात झालेली असून या ऑडिशनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल व्हायरल झालेले आहेत. काही मॉडेल आणि अभिनेत्री यांनी यासाठी ऑडिशन दिलेली असून ऑडिशनचे व्हिडिओ देखील त्यांच्या प्रेमप्रकरणाइतकेच सध्या चर्चेत आलेले आहेत.


शेअर करा