सुनेच्या नातेवाईकांची धास्ती मनात बसली अन.., सासऱ्याचे टोकाचे पाऊल

शेअर करा

आपली सून तिचा भाऊ आणि तिचे इतर नातेवाईक आपल्या पोटच्या मुलाचे काहीतरी बरे वाईट करतील या भीतीने धास्ती घेतलेल्या एका 67 वर्षीय सासऱ्याने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. मयत व्यक्ती यांच्या मुलाने पोलिसात धाव घेत त्याची पत्नी मेहुना आणि सासू-सासर्‍यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दिलेली आहे. अकोला जिल्ह्यातील खदान पोलिसांनी 12 तारखेला याप्रकरणी गुन्हा नोंदवलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मनोहरराव शंकरराव धोत्रे ( राहणार गायत्री नगर खदान ) यांनी असे मयत व्यक्ती यांचे नाव असून त्यांनी 18 नोव्हेंबर 2022 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मनोहरराव धोत्रे यांची सून रूपाली धोत्रे , तिचा भाऊ मलकापूर येथील शिवसेना तालुकाप्रमुख दीपक चांभारे , सेवानिवृत्त नायब तहसीलदार रमेश चांभारे आणि मंदाकिनी चांभारे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

फिर्यादी असलेले पंकज धोत्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे की बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील सेवानिवृत्त झालेले नायक तहसीलदार रमेश चांभारे यांच्या मुलीसोबत आठ मे 2015 रोजी आपले लग्न झालेले होते त्यानंतर अवघ्या एक वर्षात आपल्या पत्नीचा भाऊ दीपक चांभारे याने धोत्रे कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध बहिणीच्या चुलत नंदेसोबत लग्न केले त्यामुळे दोन्ही कुटुंबात वाद सुरू झालेले होते. चुलत बहिणीला देखील सासरी जाच होत असल्याने या वादात आणखीनच भर पडलेली होती.

चांभारे कुटुंबीयांकडून सातत्याने त्रास होत असल्याने पीडित महिलेने अखेर तिचा पती दीपक चांभारे , सासू-सासरे यांच्या विरोधात खदान पोलिसात गुन्हा दाखल केला. त्याचा राग मला ठेवून पंकज याची पत्नी आणि तिचे नातेवाईक पंकज आणि त्याच्या वडिलांना सातत्याने त्रास देत होते. तुमच्याकडे बघून घेऊ तुमच्यावर खोट्या केसेस टाकू यामुळे आपले वडील मनोहरराव हे दहशतीखाली राहत होते. आपली सून आणि तिचे नातेवाईक आपल्या मुलाचे बरे वाईट करतील याची भीती त्यांना होती त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असा आरोप पंकज धोत्रे यांनी केलेला असून पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केलेला आहे.


शेअर करा