सोशल मीडियावर ‘ या ‘ विवाहाची जोरदार चर्चा होण्याचे कारणही खास

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून बिहार येथे हा विवाह पार पडलेला आहे. एका 42 वर्षीय शिक्षकाने त्यांचीच विद्यार्थिनी असलेल्या वीस वर्षीय तरुणीशी हा विवाह केलेला आहे. बिहारच्या समस्तीपुर येथील ही घटना असून त्यांच्या वयात असलेला फरक हाच त्यांच्या विवाहाच्या चर्चेचे कारण ठरलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर शिक्षक यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झालेले आहे मात्र त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले नाही. आपल्याला आयुष्य त्याने काढायचे नव्हते मात्र योग्य अशी वधू आपल्याला मिळत नव्हती असे त्यांनी म्हटले असून सदर शिक्षक हे इंग्लिश विषय शिकवतात. त्यांच्या क्लासेसमध्ये येणाऱ्या एका तरुणीवर त्यांचा जीव जडला आणि त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन विवाह केलेला आहे आहे. त्यांच्या लग्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. श्वेताकुमारी असे तरुणीचे नाव असून संगीत कुमार असे या शिक्षकाचे नाव आहे.

गुरुवारी या शिक्षकाने आपल्या विद्यार्थिनीसोबत मंदिरात जाऊन सात फेरे घेतले. परिसरातील अनेक नागरिक तसेच नवरीसोबत शिकत असलेले इतर विद्यार्थीदेखील या विवाहाला हजर होते. त्यानंतर त्यांनी कोर्टात जाऊन रीतसर कोर्ट मॅरेजदेखील केलेले आहे. त्यांच्या प्रेम कहानीची सुरुवात ही कोचिंग क्लासमध्ये सुरू झालेली होती मात्र त्यानंतर अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.


शेअर करा