स्वतःचीच मुंडकी हवनकुंडात पडावी म्हणून मशीन बनवलं अन.. , पती पत्नीचा मृत्यू

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण गुजरातच्या राजकोट परिसरात समोर आलेले असून विंची या गावात अंधश्रद्धेची एक अजब घटना समोर आलेली आहे. एका जोडप्याचे त्यांच्याच शेतात चक्क स्वतःचे मुंडके कापून हवनकुंडात पडलेले आढळून आले आहे . तांत्रिक विधीनंतर या जोडप्याने देवतेला प्रसन्न करण्यासाठी स्वतःचा शिरच्छेद केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मयत पती-पत्नींनी त्यांचे दोन्ही मुंडके कापून हवनकुंडात पडावेत यासाठी धारदार शस्त्र बनवून त्यासाठी एक स्टॅन्डदेखील केलेले होते . दोरी हातातून निसटल्यानंतर जड शस्त्र मानेवर पडेल आणि त्यानंतर दोन्ही डोके मुंडके तुटून ती हवन कुंडात पडतील अशी व्यवस्था त्यांनी केलेली होती. दोन्ही पती-पत्नीची मुंडके तुटून यात वेगळी झाली त्यात महिलेचे मुंडके हे हवन कुंडात पडलेले होते तर नवऱ्याचे डोके झोपडीच्या एका कोपऱ्यात उडून पडलेले आढळून आलेले आहे.

पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी तिथे पन्नास रुपयाचा एक स्टॅम्प पेपर देखील आढळून आलेला असून हे मृतदेह हेमू भाई आणि हंसाबेन मकवना यांचा हा मृतदेह असल्याचे समोर आलेले आहे. घटनास्थळी त्यांनी कमळाची पूजा केल्याचे देखील दिसून येत असून त्यांना हा तांत्रिक विधी करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले होते का ? याचा पोलिसांनी शोध सुरू केलेला आहे. त्यांच्या शेतात हा प्रकार घडलेला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

स्थानिक पातळीवर पोलिसांनी चौकशी केली त्यामध्ये दोन्ही नवरा बायको हे मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते. त्यांना दोन मुले देखील असून त्यांची देखील त्यांनी काळजी केली नाही. घटनेच्या एक दिवस आधी यांनी इतर नातेवाईकांच्या घरी मुलांना नेऊन घातले. गेल्या तीन वर्षांपासून ते तांत्रिक साधना करत होते. हवनकुंडात कमळ पूजा करण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला असे समोर आलेले असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आलेले आहेत.


शेअर करा