हत्याकांड असं कल्पनेच्याही पलीकडचं , मानसी देखील समोर आली पण..

शेअर करा

सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री निर्माण झाल्यानंतर एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार छत्तीसगड येथील रायपूर येथे समोर आलेला असून राजनंदगाव जिल्ह्यातील डोंगरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आलेला होता. सदर प्रकरणी अखेर पोलिसांना प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यात यश आलेले असून जे काही सत्य समोर आलेले आहेत त्यावर विश्वास ठेवणे देखील कल्पनेच्या पलीकडले आहे. आरोपी तरुणाने मयत तरुणाच्या सोबत मुलगी बनून चॅटिंग केलेले होते त्यानंतर त्यांचे भेटण्याचे ठरले आणि भेटल्यानंतर समोरील व्यक्ती हा मुलगा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला त्यावेळी मुलगी बनवून चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीने त्याला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाचा खून केलेला आहे.

सदर मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोषण साहू नावाच्या एका व्यक्तीने हा व्यक्ती मयत तरुण हा आपला पुतण्या असल्याची माहिती दिली. कोमेश साहू असे मयत तरुणाचे नाव असून तीन मे ला तो सकाळी दहाच्या सुमारास एका लग्नासाठी म्हणून घरातून निघून गेला होता त्यानंतर तो पुन्हा आलाच नाही.

पोलिसांनी आसपासच्या गावातील सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या बँकेचा तपशील शोधला त्यावेळी त्याचे अखेरचे लोकेशन हे मेढा गावात सापडलेले होते. देवेंद्र सिन्हा नावाच्या व्यक्तीने त्याला मोबाईल दिल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी देवेंद्र याला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली त्यावेळी देवेंद्र याने गेल्या आठ महिन्यांपासून आपण कोमेश याच्यासोबत मानसी नावाने चॅटिंग करत होतो. तीन मे रोजी त्याला भेटण्यासाठी बोलावले होते त्यानंतर समोर आल्यानंतर आपण तरुण आहोत हे लक्षात आल्यानंतर वाद झाला आणि त्याने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली त्यामुळे आपण त्याचा खून केला . कोमेश याने तक्रार करू नये अशी इच्छा असेल तर मला पैसे आणून दे असे सांगितले होते.

देवेंद्र याने मी घरी जाऊन पैसे घेऊन येतो असे म्हणत तो घरी गेला आणि येताना चाकू घेऊन आला आणि त्यानंतर पैशाच्या आशेने वाट पाहत बसलेल्या कोमेश याच्यावर त्याने हल्ला केला त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. देवेंद्र याने कोमेश याची बॅग तपासली त्यावेळी त्याच्या बॅगमध्ये एक लाख रुपये होते हे देखील पैसे देवेंद्रने घेतले आणि हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू येथील झाडीत लपवलेला होता. कोमेश याच्या मोबाईलमधील चॅटिंग त्याने डिलीट केले आणि तो मोबाईल एका तिसऱ्या व्यक्तीला दिलेला होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे .


शेअर करा