हर्षवर्धन जाधव त्या प्रकरणावर म्हणाले , प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली म्हणून ..

शेअर करा

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन रविवारी दुपारी तीन वाजता कन्नड शहरातील कॉलेज रोड येथे हर्षवर्धन यांनी आपल्याला बेदम मारहाण केली अशी तक्रार इशा झा यांनी कन्नड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध त्यामुळे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

इशा झा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केलेला असून त्यामध्ये आज हर्षवर्धन जाधव यांनी मला बेदम मारहाण केली आहे. माझे केस पकडून त्यांनी मला मारहाण केली त्यामुळे मी पोलिसात तक्रार दाखल केली असून आता काय होईल हे मला माहिती नाही असे म्हटले आहे तर दुसरीकडे हर्षवर्धन जाधव यांनी सदर विषय हा घरगुती आहे त्यामुळे इतरांनी नाक खुपसू नये . आपण राजकारणात असल्यामुळे हे सगळं होत आहे. प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न या प्रश्नापेक्षा खूप मोठे आहे शेतकरी अडचणीत आहे त्यांना मदत करायचे पहा असे म्हटले आहे.


शेअर करा