‘ हस्ते ‘ प्रकार बंद होणार , विद्यार्थ्यांपुढे अडचणी वाढण्याची शक्यता

शेअर करा

अनेक जमिनींच्या आणि खरेदीच्या व्यवहारात एखाद्या व्यक्तीच्या हस्ते मुद्रांक खरेदी करण्यात येतो मात्र आता ही पद्धत बंद करण्यात येणार असून मुद्रांक पेपर घेण्यासाठी स्वतः हजर राहावे लागणार आहे. एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झालेली असून तसे आदेश शासनाच्या वतीने काढण्यात आलेले आहेत.

पूर्वापार चालत आलेला ‘ हस्ते ‘ हा प्रकार आता बंद करण्यात येणार असून एक एप्रिलपासून स्टॅम्प पेपर घेण्यासाठी पक्षकार असलेल्या व्यक्तीला मुद्रांक विक्रेत्याकडे स्वतः हजर राहून सही करून त्यानंतर मुद्रांक पेपर घ्यावा लागणार आहे. नागरिकांनी देखील एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या हस्ते मुद्रांक घेण्यासाठी आग्रह करू नये असे शासनाकडून कळविण्यात आलेले आहे.

शालेय कामकाजासाठी देखील अनेकदा मुद्रांकाची गरज पडते त्यामध्ये गॅप सर्टिफिकेटसोबतच इतरही काही कागदपत्रांसाठी मुद्रांकाची गरज असते. अनेक ठिकाणी विद्यार्थी एका जिल्ह्यातील रहिवासी असून दुसऱ्या जिल्ह्यात शिकत असतात त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करणे त्यांच्यासाठी अत्यंत अवघड होणार असून विद्यार्थ्यांना तरी कमीत कमी यामध्ये दिलासा देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे.


शेअर करा