हाच का तो भाजपचा विकास ? , विकासयात्रेत तरुणीचा अश्लील डान्स : पहा व्हिडीओ

शेअर करा

भाजपकडून आपण अनेक विकास कामे केली आहेत असे दावा करत देशात ठिकठिकाणी विकास यात्रा काढण्यात येत आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या विकास यात्रांचे नियोजन करण्यात येते मात्र गर्दी व्हावी म्हणून जे काही प्रकार करण्यात येतात त्याचीही सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होते.सध्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये चक्क एक महिला ‘ मै तो रस्ते से जा रहा था ‘ या गोविंदाच्या गाण्यावर डान्स करताना आणि अश्लील हावभाव करत नाचताना दिसून येत आहे.

सदर व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही मात्र व्हिडिओच्या पाठीमागे पंतप्रधान मोदी यांचा फोटो आणि विकास यात्रा ही 5 फेब्रुवारी पासून 25 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे असा एक फ्लेक्सचा बोर्ड लावलेला आहे तर बोर्डच्या समोर एक तरुण आणि तरुणी चक्क तंबाखू किंवा इतर काहीतरी पदार्थ खाताना देखील दिसत आहे तर समोर ही तरुणी ; मै तो रस्ते से जा रहा था ‘ म्हणत अश्लील हावभाव करत डान्स करत आहे. सदर व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून ‘ हाच का तो भाजपचा विकास ? अशी देखील टीका या व्हिडिओवर करण्यात येत आहे.


शेअर करा