हाय प्रोफाइल मद्यधुंद महिलेकडून वॉचमनसोबत गैरवर्तन , पहा व्हिडीओ

शेअर करा

देशात सध्या आर्थिक दरी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून नोटबंदी आणि जीएसटीनंतर अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हाल झालेले आहेत. ज्यांच्याकडे सुरुवातीपासून भरपूर पैसा होता त्यांच्याकडेच पैसा एकवटत असून अनेकदा लायकीपेक्षा जास्त पैसा आल्यानंतर या व्यक्तींमध्ये अहंकार जागा होतो आणि त्यातून गोरगरिबांवर अन्याय करणे अशी त्यांची वर्तणूक वेळोवेळी दिसून येते. असाच एक प्रकार सध्या नोएडा येथे समोर आलेला असून एका उच्चभ्रू सोसायटीतील महिलेने इमारतीच्या वॉचमनला मद्यधुंद अवस्थेत अत्यंत हीन अशी वागणूक दिलेली आहे. सदर व्यक्तीने फक्त त्याचे काम केले इतकाच त्याचा गुन्हा असून त्यामुळे या महिलेचा ‘ इगो ‘ दुखावला गेला आणि तिने त्याच्यासोबत निंदनीय असे वर्तन केले.

सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला असून दिशा असे या मद्यधुंद अवस्थेतील महिलेचे नाव आहे. एका सुरक्षारक्षकाशी ती हुज्जत घालत असून तिने अचानकपणे येऊन या सिक्युरिटी गार्डची कॉलर धरली आणि त्याला जवळ ओढत त्याने घातलेली टोपी देखील फेकून दिली. इतके सगळे होऊन देखील हा सिक्युरिटी गार्ड तिला काहीही बोलत नव्हता उलट संयमाने आपले हात पाठीमागे धरून त्याने महिलेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र मद्यधुंद अवस्थेतील महिला आणि आपल्याकडील पैशाचा माज इतका मोठा होता की त्याच्या अगदी तोंडाजवळ जाऊन त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील करत होती.

दिशाचा मित्र हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत असून एक गृहस्थ सुरक्षारक्षकाला संबोधत असे म्हणतो की, ‘ पंकज तू जरा स्तब्ध उभा राहा. तिला गैरवर्तन करू दे ‘ त्यानंतर हा दुसरा गृहस्थ देखील आपल्या फोनमध्ये या महिलेचे आक्षेपार्ह वर्तन रेकॉर्ड करत आहे. पंकज वॉचमनच्या बाजूने बोलत असताना दिसत असून आणखीन एक व्यक्ती भांडण सोडविण्याचा प्रयत्न करतो मात्र महिला कोणाचेच म्हणणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही.

सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी कारवाई करत तिच्यासोबत असलेल्या अंजली आणि आणखी एका महिलेला अटक केली असून सुरक्षारक्षकाने महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रार दाखल झाल्याची खबर महिलेला मिळाली आणि त्यानंतर ती फरार झाली. पोलिसात तक्रार दाखल होताच आरोपी फरार कसे होतात ? याचीदेखील चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


शेअर करा