हृदयद्रावक..चिमुरड्यांच्या पायात बिसलरीची चप्पल बांधत कामाचा शोध होता सुरु

शेअर करा

देशात सध्या अनेक ठिकाणी उन्हाने नागरिकांची लाहीलाही होत असतानाच मध्यप्रदेशातील शोपूर शहरात एक हृदयद्रावक अशी घटना समोर आलेली आहे . एका महिलेचा तिच्या निरागस मुलांसोबत फोटो व्हायरल होत असून तिने उन्हाच्या तडाक्यापासून वाचण्यासाठी तिच्या चक्क तीन लहान मुलांच्या पायाला चक्क बिसलरीच्या बाटलीची चप्पल बांधलेली आहे . फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आलेली असून या महिलेला मदत करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रुक्मिणी असे या महिलेचे नाव असून तिच्यासोबत तिच्या निष्पाप तीन मुली देखील दिसून येत आहेत. शोपुर शहरात रस्त्यावरती महिला अशा पद्धतीने फिरत होती त्यावेळी इन्साफ कुरेशी नावाच्या एका व्यक्तीने तिचा फोटो काढला आणि तिच्यासोबत चर्चा केली त्यावेळी तिचा नवरा आजारी आहे आणि आपण कामाच्या शोधासाठी शहरात आलेलो आहोत असे तिने सांगितले. इंसाफ यांनी त्यानंतर तिला चप्पल खरेदीसाठी रोख रक्कम देखील दिलेली आहे.

फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने अखेर या महिलेचा पत्ता शोधून काढलेला असून तिच्या घरी तिचा पती सुरज आणि मुली असतात अशी माहिती समोर आली . रुक्मिणी आता एक वर्षांचा मुलगा मयंक याच्यासोबत राजस्थान येथे मजुरी कामासाठी गेलेली आहे. तिच्या पतीला टीबीचा आजारा असून सर्व कुटुंब आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे तिच्या रोजंदारीवरच कुटुंबाची उपजीविका सुरू आहे. कुटुंबाकडे रेशन कार्ड देखील नाही मात्र फक्त आधार कार्ड असल्याकारणाने त्यांना रेशनचा देखील फायदा होत नाही असे महिलेने सांगितलं आहे .


शेअर करा