अंजू भारतात येण्याचा मार्ग मोकळा , नसरुल्लाच्या प्रेमात गाठला होता पाकिस्तान

शेअर करा

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर प्रियकरासाठी देश सोडून पाकिस्तानला गेलेली 34 वर्षांची अंजू थॉमस ही पुन्हा भारतात परतणार आहे. तीन महिन्यापूर्वी तिने नसरुल्ला नावाच्या तिच्या मित्रासोबत निकाह केलेला होता . सध्या ती पाकिस्तानच्या खैबर भागात राहत असून तिचा पती नसरुल्ला याने यासंदर्भात माहिती दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , अंजू ही मूळची राजस्थानची रहिवासी असून तिला पंधरा वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. दोन मुलांना सोडून पाकिस्तानला गेलेली अंजू आता भारतात परत येणार असून पाकिस्तानने तिच्या व्हिसाची मुदत एक वर्षांनी वाढवली होती. तिने धर्मांतर केलेले असून फातिमा असे नवीन नाव स्वतःचे ठेवलेले आहे.

भारतात जाण्यासाठी तिला पाकिस्तान सरकारची परवानगी आवश्यक आहे मात्र तिला अद्याप भारतात येण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही . काही दिवसात ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ती वाघा बॉर्डर ओलांडून भारतात येणार आहे. मुलांच्या भेटीसाठी आपण भारतात जात आहोत असे तिने तेथील माध्यमांना सांगितलेले असून आता पाकिस्तान हेच आपले घर आहे असे तिने म्हटलेले आहे.

25 जुलै रोजी अंजू हिने नसरुल्ला नावाच्या तीस वर्षीय व्यक्तीसोबत निकाह केलेला होता. फेसबुकच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली . नसरुल्ला हा पाकिस्तानच्या खैबर प्रांतातील रहिवासी असून दोघांची ओळख 2019 मध्ये झालेली होती त्यानंतर त्यांच्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले आणि अंजूने भारत सोडला . तिचा पहिला पती याला देखील तिने फोनवरती खडे बोल सुनावले होते .


शेअर करा