अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफित दाखवून अत्याचार , फुटबॉल प्रशिक्षकावर गुन्हा

शेअर करा

पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका फुटबॉल प्रशिक्षक असलेल्या व्यक्तीने प्रशिक्षण देण्याचा बहाना करत एका मुलीला मोबाईलवर अश्लील चित्रफित दाखवली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , यश हेमंत जैन ( वय पंचवीस वर्ष राहणार मार्बल आयडियल उंड्री ) असे आरोपीचे नाव असून मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी कोंडवा पोलिसात फिर्याद दिलेली आहे. तक्रारदार व्यक्ती यांची 14 वर्षीय मुलगी जैन याच्याकडे फुटबॉल प्रशिक्षणासाठी जात होती याच दरम्यान त्याने तिच्याशी जवळीक साधली आणि अश्लील चित्रपट दाखवून तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.


शेअर करा