कंगना राणावत यांना कानशिलात लगावल्याचा बदला ? , हिमाचलमध्ये एक दाम्पत्याला घेरलं अन.. 

शेअर करा

भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत यांना चंदीगड येथील एअरपोर्टवर कानशिलात लगावल्यानंतर एका अनिवासीय भारतीय दाम्पत्याला हिमाचल प्रदेश मध्ये 100 जणांच्या समूहाने मारहाण करण्याचा दुर्दैवी प्रकार समोर आलेला आहे. हिमाचल प्रदेश मधील डलहौसी इथे ही घटना घडलेली असून गाडी लावण्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

पीडित कुटुंबीय हे पंजाबमधील रहिवासी असून गेल्या पंचवीस वर्षांपासून स्पेन या देशाचे रहिवासी आहेत. नातेवाईकांना भेटण्यासाठी ते भारतात आलेले होते याच दरम्यान हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे फिरत असताना गाडी लावण्यावरून त्यांचा स्थानिक व्यक्तींशी वाद झाला आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. 

आपण पंजाबी आहोत म्हणून आपल्याला मारहाण करण्यात आली असा दावा या दांपत्याने केलेला असून हल्लेखोर व्यक्तींमधील अनेक जण कंगना राणावत यांचे नाव घेऊन त्यांना मारहाण करत होते असेही त्यांनी म्हटलेले आहे. 


शेअर करा