खाकीला काळिमा फासणाऱ्या ‘ त्या ‘ पोलिसाची संगमनेरला बदली , काय घडलंय नक्की ?

शेअर करा

खाकीला काळिमा फासण्याचा प्रकार नगर जिल्ह्यात अकोल्यात समोर आलेला असून सासरी छळ होत असलेली एक महिला पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने तिच्याशी संपर्क वाढवत तिला व्हाट्सअप आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्रास देण्यास सुरुवात केली मात्र अखेर या कर्मचाऱ्याची संगमनेरला बदली करण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अकोले पोलीस ठाण्यात एक विवाहित महिला सासरकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याकारणाने पोलीस ठाण्यात पोहोचलेली होती. अकोले पोलीस ठाण्यातील या पोलीस कॉन्स्टेबलने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि त्यानंतर तिला फोनवर त्रास देण्यास सुरू केली.

पीडित महिला ही अकोले शहराजवळील एका गावात राहत असून 2023 मध्ये तिचा विवाह झालेला होता. सासरच्या व्यक्तींकडून शारीरिक मानसिक छळ सुरू असल्याकारणाने तिने अकोले पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या अर्जाचा तपास दोन पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांकडे देण्यात आलेला होता. 

तपासाचा बहाना करून दोन्ही पोलीस तिच्या घरी गेले आणि माहिती लिहून घेतली मात्र यातील एका पोलिसाची नियत फिरली आणि त्याने अर्जावरील तिचा नंबर स्वतःच्या मोबाई मध्ये सेव केला आणि तिला व्हाट्सअपवर अश्लील मेसेज लिहिण्यास सुरुवात केली. महिलेले रिप्लाय दिला नाही म्हणून आरोपीने तिला व्हाट्सअप कॉलवर कॉल देखील करण्यास सुरुवात केली. 

पीडित महिला अस्वस्थ झाली आणि तिने झाला प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला त्यानंतर या पोलीस कॉन्स्टेबलच्या कृत्याची माहिती संगमनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना एका अर्जाद्वारे करण्यात आली त्यानंतर या पोलीस कॉन्स्टेबलची संगमनेरला बदली करण्यात आलेली आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी आता तालुक्यात जोर धरू लागलेली आहे. 


शेअर करा