खासदार निलेश लंके यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट , म्हणाले की.. 

शेअर करा

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलेले असले तरी त्यांची प्रकृती खालावलेली असल्याकारणाने छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. 

मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर निलेश लंके म्हणाले की, ‘ जरांगे पाटलांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या हितासाठी हा लढा उभारला आहे. या आंदोलनाची सुरुवात करताना त्यांचं वजन ५१ किलो होतं मात्र उपोषणामुळे टप्प्याटप्प्याने त्यांचं वजन कमी होत गेलं आणि ते आता अवघं ३६ किलो इतकं झालं आहे. सरकार किती काळ या मागण्यांचं घोंगडं भिजत ठेवणार आहे. या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे ‘ असे म्हटले आहे . 

मनोज जरांगे पाटील यांच्या ,’ सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी,  मराठा आणि कुणबी हे एकच आहेत याबाबतचा कायदा करावा, अंतरवाली सराटीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा आणि कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला एक वर्षांसाठी मुदतवाढ द्यावी ‘ अशा प्रमुख मागण्या आहेत.


शेअर करा