छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याची शक्यता , मुंबईत म्हणाले की..

शेअर करा

‘ मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही हे सत्य असून आपण ओबीसी समाज बांधवांसोबत यासाठी आंदोलनात उतरू ‘ असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेला आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

मुंबईत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की ,’ राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाज बांधवांच्या मागण्यासाठी काहीजण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याशी मी संवाद साधत असून मी प्रत्येक जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसोबत चर्चा केलेली आहे. निवडणुकीतील विजय आणि पराजयाची कारणे आम्ही शोधून काढलेली असून आमच्या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यादेखील याविषयी देखील चर्चा केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आम्ही लवकरात लवकर जातीय जनगणना करण्याची मागणी करणार आहोत ‘, असे देखील ते पुढे म्हणाले.

अजित पवार गटाची भाजपकडून होत असलेली उपेक्षा लपून राहिलेली नसल्याकारणाने छगन भुजबळ अजित पवार गटातून बाहेर पडून ओबीसींसाठी स्वतंत्र  राजकीय पक्षाची घोषणा करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.  अद्यापपर्यंत या विषयावर छगन भुजबळ यांनी बोलणे टाळलेले असले तरी छगन भुजबळ यांची मागील काही वक्तव्य पाहता ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता दिसून येत आहे. 


शेअर करा