ठरलं तर मग..विधानसभा देखील महाविकास आघाडी  एकत्रित लढवणार 

शेअर करा

लोकसभा निवडणुकीत भाजपचा अहंकारी रथ रोखण्यात यश आल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला असून मुंबई येथील पत्रकार परिषदेत विधानसभेची आगामी निवडणूक पुन्हा एकत्रित लढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. 

महाविकास आघाडीची शनिवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ,’ महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठे यश मिळालेले आहे या निवडणुकीत आमचे तीन पक्ष असले तरी छोटे-मोठे पक्ष आणि काही संघटना सामाजिक कार्यकर्ते देखील आमच्याबरोबर होते त्यामुळे आम्ही सर्वांचे आभार मानतो. भाजपला शेतकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवलेला असून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात आला मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही ,’ असे म्हटलेले आहे. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ,’ येत्या दोन-तीन महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागतील इतर राज्यातही निवडणुका होतील. मुळात मोदी हे सरकार आता एनडीए सरकार झालेले आहे ते किती दिवस चालेल हा देखील एक प्रश्न असून आमच्याबद्दल ही युती नैसर्गिक की अनैसर्गिक असे म्हटले जात होते मात्र दिल्लीला आता जे काही कळबोळ झालेल आहे ते नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे हा देखील एक प्रश्न आहे ‘, असेही ते पुढे म्हणाले. 

शिवसेनेला मराठीमध्ये मिळाले नाहीत असा नरेटीव सेट करणाऱ्यांचा देखील उद्धव ठाकरे यांनी चांगला समाचार घेतलेला असून ,’ आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मीयांनी मतदान केलेले आहे त्यात मराठी तर आहेतच हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध आणि इतर सर्वच आहेत . रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्यांच्या डोळ्यादेखत लुटली जात असेल तर मराठी माणूस मुंबई लुटणाऱ्याला मत देईल का ? . महाराष्ट्र आणि मुंबई लुटणाऱ्यांना मराठी माणूस झोपेतही मतदान करणार नाही मात्र भाजपला अजून वास्तव्याची जाणीवच झालेली नसेल तर येत्या निवडणुकीत त्यांना निकालाच्या वास्तवाला सामोरे जावे लागेल ,’ असे ते पुढे म्हणाले. 


शेअर करा