‘ तरीही पाळणा हलेनाच ‘ म्हणून पतीच्या ‘ त्या ‘ निर्णयाने बायकोला बसला धक्का

शेअर करा

मुलं व्हावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते मात्र कधी कधी काही कारणांनी अपत्यप्राप्ती होत नाही आणि त्यातून घरगुती कलह निर्माण होतो. अशाच एका घटनेत लग्नाला 7 वर्षं उलटूनदेखील मूल होत नसल्याने पत्नीपासून घटस्फोट हवा असल्याची मागणी पतीनं कोर्टात केली आहे.मध्य प्रदेशच्या ग्वालियर येथील ही बातमी असून सदर पतीचे याआधी देखील एक लग्न झाले आहे मात्र तिला देखील मूल होत नसल्याने पतीने तिला घटस्फोट दिला अन दुसरे लग्न केले मात्र इथे देखील तोच अनुभव आल्याने या पतीला आता पुन्हा घटस्फोट हवा आहे मात्र पत्नी त्याला सोडायला तयार नाही . सध्या प्रकरण समुपदेशन केंद्रात आहे. आपण सगळे प्रयत्न केले असल्याचे या पतीचे म्हणणे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये राहणाऱ्या 41 वर्षांच्या या व्यक्तीचं हे दुसरं लग्न असून त्याने 2009 साली त्यानं पहिलं लग्न केलं होतं. लग्नानंतर चार वर्ष झाली मात्र त्याला अपत्यप्राप्ती झाली नाही त्यामुळं वैतागून त्याने तिला घटस्फोट दिला. दोन वर्षं दुसरी बायको मिळते का याचा त्याने शोध घेताना अन पुन्हा दुसरं लग्न केलं मात्र दुसऱ्या लग्नालाही 7 वर्षं उलटली आणि तरीही त्याच्या बायकोला दिवस काही जाईनात म्हणून त्याने दुसऱ्या पत्नीलाही घटस्फोट देण्याची तयारी केली मात्र बायको देखील घटस्फोट न देण्यावर ठाम होती.

बायकोची तब्येत बिघडल्यानंतर पतीने तिला माहेरी आणून सोडलं मात्र तिला मुलंच होत नाही तर मी कशाला तिला घेऊन जाऊ ? असे सांगत त्याने घटस्फोटासाठीचा अर्ज पाठवून दिला. त्याचा हा अर्ज पाहून माहेरी धक्काच बसला अन पत्नीने या घटस्फोटाला तयारी नसल्याचं कोर्टात सांगितलं. मला माझ्या पतीसोबतच राहण्याची इच्छा असून घटस्फोटाला आपण तयार नसल्याचं तिनं म्हटलं आहे. कोर्टानं सध्या दोघांनाही समुपदेशन घेण्याचा सल्ला दिला आहे मात्र पतीच्या अशा वागण्याने न्यायालयाने देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.


शेअर करा