त्यांनी माझ्या विजयात श्रीकृष्णाची भूमिका बजावली , निलेश लंके म्हणाले की.. 

शेअर करा

नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संगमनेर इथे जाऊन बाळासाहेब थोरात यांचा सत्कार केला त्यावेळी ,’ आपण अत्यंत सामान्य कार्यकर्ता असून संघर्षातून पुढे आलेलो आहे लोकसभा निवडणुकीत आपली लढाई बलाढ्य शक्तीशी होती त्यात आपल्या विजयात आमदार बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा आहे . त्यांनी या विजयात श्रीकृष्णाची भूमिका बजावली ,’  असे म्हटलेले आहे. 

निलेश लंके यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना इथे जाऊन बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. निलेश लंके म्हणाले की ,’ महाभारतात कौरव पांडवाच्या युद्धात श्रीकृष्णाने मोलाची भूमिका बजावली होती तशीच बाळासाहेब थोरात यांनी माझ्या विजयात बजावलेली आहे. माझ्या विजयाचे खरे किंगमेकर तेच आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार , आमदार बाळासाहेब थोरात यांचा विश्वास आणि जनतेच्या साथीमुळे आपला विजय झालेला आहे.’ 

बाळासाहेब थोरात यावेळी बोलताना म्हणाले की,’  नगर दक्षिणची लढाई श्रीमंत विरुद्ध गरिबाची होती. निलेश लंके संघर्षातून पुढे आलेले आहेत. कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय काम केलेले असून त्यांची लोकप्रियता मोठी होती त्याची धास्ती घेऊन सत्ताधाऱ्यांनी दडपशाहीचा वापर केला मात्र जनतेने त्यांना नाकारले. जीवाला जीव देणारी माणसे लंके यांनी निर्माण केलेली आहेत त्यांचे भविष्य उज्वल आहे ‘, असे देखील थोरात पुढे म्हणाले.


शेअर करा