धक्कादायक..अल्पवयीन सख्ख्या मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण पुण्यात मंचर परिसरात समोर आलेले असून दोन अल्पवयीन सख्ख्या मावस बहिणींवर सामूहिक बलात्काराचा प्रकार पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आलेला आहे. आरोपींनी या प्रकाराचे चित्रीकरण केलेले असून दोन अल्पवयीन मुलांसोबत इतर तीन जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

सदर प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिलेली असून दोन्ही अल्पवयीन मुली घरी एकट्याच होत्या त्यावेळी आरोपी दोन अल्पवयीन मुले यांच्यासोबत अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोराडे हे घरी आले आणि त्यांनी या मुलींसोबत गैरप्रकार केला. 

मुलींनी विरोध केला असता त्यांना हाताने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली याचवेळी कुणाल बोराडे याने या प्रकाराचे शूटिंग केले असेही फिर्यादींचे म्हणणे आहे . 


शेअर करा