नगर शहरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीकडे लैंगिक सुखाची मागणी , तोफखान्यात गुन्हा दाखल

शेअर करा

नगर शहरात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून तारकपूर बस स्टँड जवळ असलेल्या एका प्रतिष्ठित कॉलेजमधील शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आरोपीच्या विरोधात तोफखाना पोलिसात आयपीसी 354 , 506 तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सतीश शिर्के असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो शहरातील या कॉलेजमध्ये भूगोल विषय शिकवण्याचे काम करतो. अल्पवयीन मुलगी ही सध्या इयत्ता बारावीला असून  याच कॉलेजमध्ये शिकते.  इयत्ता बारावी भूगोलचे प्रॅक्टिकल पेपर सुरू असताना आरोपी सतीश शिर्के याने तुला 20 पैकी 20 मार्क पाहिजे असतील तर मला काय देशील असे म्हणत एकदा नव्हे तर तिच्याकडे अनेकदा शारीरिक सुखाची मागणी केली.  मुलगी टाळत आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने तिला परीक्षेत शून्य मार्क दिले म्हणून तिने सतीश शिर्के याला विचारणा केली त्यावेळी त्याने तिला केबिनमध्ये बोलावले. 

8 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास  पीडित मुलगी केबिनमध्ये पोहोचली . आरोपी याने त्यानंतर लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने त्याच्या पॅन्टवर पुढील बाजूस हात फिरवून अश्लील हावभाव करत मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत ‘ तुला पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर तुला मला काहीतरी द्यावे लागेल ‘ असे म्हणाला. अल्पवयीन मुलगी या प्रकाराने घाबरून गेली आणि त्यानंतर घरी जाऊन तिने आई-वडिलांना या प्रकरणाची कल्पना दिली त्यानंतर तोफखाना पोलिसात आरोपी सतीश शिर्के याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. 


शेअर करा