नीट 2024 निकाल घोटाळा ही व्यापम घोटाळ्याचीच पुनरावृत्ती

शेअर करा

नीट 2024 परीक्षेचा निकाल हा वादात सापडल्यानंतर ‘ मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्याचीच ही पुनरावृत्ती आहे ‘ असा घनाघाती आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. अशा गैरप्रकारांपासून मोदी सरकार पळ काढू शकत नाही असे देखील काँग्रेसने भाजपला ठणकावले आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी ,’ केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एनटीएच्या माध्यमातून ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. मोदी सरकारच्या काळात पेपर फुटणे गैरव्यवहार , वाढीव गुणाचे प्रकरण अशी प्रकरणे वारंवार समोर येत असल्याने विद्यार्थी आणि पालकांचे भविष्य टांगणीला लागलेले आहेत मात्र सरकारला त्याचे काही घेणेदेणे राहिलेले नाही, ‘ असे म्हटलेले आहे.


शेअर करा